Similar Story
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कायद्याच्या चौकटी बाहेर : जय भीम नगरच्या रहिवाश्यांनी कुठे जायचं?
या मालिकेच्या पहिल्या भागात, आपण बघितले कि कशी जय भीम नगरच्या रहिवाश्यांची घरं पाडली गेली आणि त्या ठिकाणी असलेल्या हिरानंदानी गार्डन्सच्या कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद इतिहासाचा आढावा घेतला. ५ ऑक्टोबर रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार पवई पोलिसांनी बीएमसीच्या एस वॉर्डमधील अधिकाऱ्यांवर, हिरानंदानी ग्रुप (HGP Community Pvt Ltd) आणि चार सहकाऱ्यांवर जय भीम नगरमध्ये अनधिकृत पाडकाम केल्याबद्दल एफआयआर नोंदवला. आरोपींवर गुन्हेगारी कट, सार्वजनिक सेवकाने इजा करण्याच्या उद्देशाने चुकीचा दस्तऐवज तयार करणे आणि खोटी माहिती पुरवणे यांसारख्या आरोपांचा समावेश आहे. पाडकामापूर्वी जय भीम नगरमध्ये राहणाऱ्या ६०० -६५० कुटुंबांपैकी सुमारे १००-१५० कुटुंबे अजूनही तिथे राहत आहेत. मागील काही महिन्यांत तीव्र पावसाचा सामना करत राहिलेल्या या…